वाढिव पाणीपट्टी कर तत्काळ रद्द करा,अन्यथा विरोधात मडका फोडो आंदोलन



*देसाईगंज शहर काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना अल्टिमेटम*

देसाईगंज-
  शहराच्या विविध वार्डात पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली असताना यावर तोडगा काढण्याऐवजी पाणीपट्टी करात प्रचंड वाढ करून शहरातील गोरगरीबांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट घातल्या जात आहे.ही अतिशय गंभीर बाब असल्याने वाढीव पाणीपट्टी कर तत्काळ रद्द करा,अन्यथा विरोधात नगर परिषद कार्यालयासमोर मडका फोडो आंदोलन करण्याचा अल्टिमेटम देसाईगंज शहर काँग्रेसने मुख्याधिकारी डाॅ. कुलभुषण रामटेके यांना दिलेल्या नोटिसीतुन दिला असल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
     दिलेल्या नोटिसीत नमुद करण्यात आले आहे की देसाईगंज शहराच्या गांधीवार्ड, हेटीवार्ड,तुकुमवार्ड,
हनुमानवार्ड,कस्तुरबावार्ड,
आंबेडकर वार्डात ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची भिषण समस्या निर्माण झाली आहे.शहरातील नागरिकांना एकवेळच्या पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असताना पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नविन पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आणल्या गेली आहे.माञ अद्यापही कार्यान्वित केली गेली नसल्याने शहरवाशियांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
     देसाईगंज नगर परिषदेत लोकल बाडी कार्यरत नसल्याने नगर परिषदेचा कारभार मागील कित्येक महिण्यांपासुन प्रशासकाच्या हातात आहे.दरम्यान प्रशासकाने शहरवाशियांची समस्या सोडवण्याऐवजी आपल्या स्तरावर तुघलकी निर्णय घेऊन १ एप्रिल २०२३ पासून पाणीपट्टी करात भरमसाठ वाढ करून शहरातील गोरगरीब जनता,छोटे व्यापारी, दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे.यामुळे संबंधितांना अधिकच अडचणींचा सामना करावा लागणार असुन यामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे जे की अन्यायकारक आहे.
    तथापि ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयाला तत्काळ स्थगिती देऊन वाढीव पाणीपट्टी कर तत्काळ रद्द करून होणारा अन्याय, अत्याचार थांबवावा.अन्यथा या विरोधात देसाईगंज शहरातील नागरिकांच्या वतीने २६ जुन २०२३ रोजी नगर परिषद कार्यालया समोर मडका फोडो आंदोलन करून घेराव आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकारी रामटेके यांना दिलेल्या नोटिसीतुन दिला आहे.
      नोटीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदु नरोटे व माजी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी रामटेके यांना देण्यात आले आहे.यावेळी ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जेसा मोटवानी,ओबीसी जिल्हा सचिव मनोज ढोरे,प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विभाग लतीफ रिझवी,नरेश लिंगायत,जगदीश तामगाडगे, जितू गेडाम,काँग्रेस नेत्या पुष्पा कोहपरे,अनुसूचित महिला सचिव समिता नंदेश्वर, रजनी आत्राम,बेबी पठाण, सफीका शेख,विमलबाई मेश्राम,कांताबाई भोयर, कमला दोनाडकर,पूजा कोल्हे, कमला मेश्राम,संगीता गणवीर,शालू मेश्राम,पुष्पा मेश्राम,ताराबाई कांबळे, शालिनी मेश्राम,सुनंदा बगमारे,वच्छला मेश्राम, कलाबाई भुते,प्रियंका वानखेडे,दिव्या बोदोले, इंद्राबाई भैसारे,शुभम तोडकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post