प्रत्येक आदिवासीं कार्यक्रमासाठी दारू पाहिजे, हे कुठे लिहिले आहे का ? - तोफा





धानोरा : आपली संस्कृती आता कुठे तरी विस्कळीत होत आहे. यामागचे कारण दारू आहे. आपल्या समाजात दारू ही देवपूजेसाठी लागते, असे समजून मानवच दारू प्राशन करू लागला. अनेक कार्यक्रमात ऐकायला मिळते की, दारू नसली तर कार्यक्रम चांगला होत नाही. परंतु, असे कुठे लिहिले आहे का? असाही प्रश्न समाजसेवक देवाजी तोफा यांनी उपस्थित केला.


धानोरा येथे पेसा अंतर्गत ३३ गावांतील ग्रामसभेचे अध्यक्ष, सचिव, पोलिसपाटील, गाव पाटील यांची इलाखा बैठक गुरुवारी आयोजित केली होती. या बैठकीत ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी दारूमुळे आदिवासी



संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांवर मार्गदर्शन केले. पुढे मार्गदर्शन करताना तोफा म्हणाले, आपल्या समाजातील तरुण मुले दारूसारख्या विषाच्या आहारी जात आहेत. अनेक तरुण मुलांमध्ये शारीरिक, मानसिक तसेच समाजात कौटुंबीक समस्या दिसून येत आहेत, हे कुठे तरी थांबायला पाहिजे, असा सल्ला देत देवाजी तोफा यांनी .

दारूमुळे होणारे नुकसान पटवून दिले. दरम्यान, उपस्थित सर्व इलाखा सहकाऱ्यांना गावातील दारूचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मुक्तिपथचे भास्कर कड्यामी व राहुल महाकुलकार यांनी व्यसन उपचारासंदर्भात माहिती देऊन व्यसनाचे शारीरिक दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच आदिवासीं समाजात असलेली एखादया व्यक्तीला काही कारणाने वाळीत टाकले जाते आणि त्या कडून कोंबडे, बकरे खाल्ले जाते हे नियमाच्या विरुद्ध आहे त्यामुळे अश्या व्यक्तीवर पोलिसात तक्रार करून कड्क कारवाही करावी कारण महाराष्ट्र सरकारने अश्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कलम ३ (१५) नुसार एखाद्या सदस्याला समाजातून काढणे अथवा काढण्याची धमकी देणे किंवा सामाजिक बहिष्कार ठरेल, असे कोणतेही कृत्य करणे, हा कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे त्यामुळे कोणत्याही समाजात असे प्रकार घडू नये आणि सर्वांनी गुण्या गोविंदाने , एकोप्याने राहावे त्यामुळे समाजाचा, देशाचा विकास होईल असे त्यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post