भारतच्या मदतीसाठी सरसावले गावातील तरुण मंडळी....


आरमोरी तालुक्यातील पेठतुकुम ( इंजेवारी) येथील कु.भारत रेवनाथ पेंदाम *(वय19 )* हा विद्यार्थी अल्पशा आजाराने ग्रस्त आहे आणी त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्यांना पुढील उपचार करणे जड जात होते.ही बाब इंजेवारी गावातील तरुण मंडळीच्या लक्षात येताच त्यांनी मित्रपरीवार ,कर्मचारीवर्ग , शिक्षकवृंद आणि गावातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्या सहकार्याने भारत पेंदाम यांना औषधोउपचाराकरिता आर्थिक मदत केली.भारत रेवनाथ पेंदाम यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्याने त्याला महागडे औषधउपचार करणे त्यांना आवश्यक होते .

भारत पेंदाम याला आर्थिक मदत करताना. कु.ईशांत ठाकरे.श्री प्रकाश दाणे .श्री रुपेश सहारे.श्री गुणवंत कथले . कु.चेतन नारदेलवार. कु.निलेश मेश्राम आदी उपस्थित होते


*विशेष:- भारत रेवनाथ पेंदाम हा महात्मा फुले विद्यालय देऊळगाव. ता. आरमोरी . जि.गडचिरोली येथे शिक्षण घेत असताना त्याने कुस्ती या खेळामध्ये सहभाग घेऊन जिल्हा स्तरावर विजय मिळवून राज्यस्तरावर निवड झाली होती.*

Post a Comment

Previous Post Next Post