हत्याकांडातील आरोपीला हुडकून काढण्यासाठी छत्तीसगडमध्ये शोध



कोरची जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पत्नीला घरगुती वादातून पतीने जंगलात जाऊन पत्नीवर कुन्हाडीने वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर घटनेच्यावेळी मुलीवरही वडिलांनी वार केल्याने तीदेखील गंभीर जखमी झाली. मात्र यातील आरोपी अद्यापही पोलिसांना गवसलेला नाही. असे असले तरी पोलिसांनी मात्र आता तपासकार्याला वेग दिला आहे. शेजारच्या छत्तीसगड राज्यातही त्याचा शोध घेतला जात आहे.

कोरची पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीनारा गावातील ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. रेखाबाई प्रितराम धकाते (५०) रा. कोचीणारा असे मृतकाचे नाव आहे. तर शामबाई संजय देवांगण (३०) असे जखमीचे नाव आहे. या दोघी आशा भक्ता व संगीता बघवा या दोन महिलांसोबत सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावालतच्या जंगल परिसरात गेल्या होत्या. तेव्हा आरोपी प्रितराम धकाते (५५) याने सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान जंगलात जाऊन पत्नी रेखाबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.

Post a Comment

Previous Post Next Post