गुड्डीगुडम व राजाराम परिसरात पावसाळा, हिवाळा,उन्हाळ्यात होतोय विजेचा लपंडाव


दर ५,१० मिनिटांनी वीज होतो तळ्यात-मळ्यात

 अहेरी :- तालुक्यातील गुड्डीगुडम व राजाराम परिसरात नागरिकांना वीज पुरवठा मुळे चांगलेच त्रास सोसावा लागत आहेत.
हवा, पाऊस नसतांना सुद्धा कमी दाबाचा पुरवठा मुळे उकाड्याने हैराण झाले आहेत सतत वीज खंडित होत असलेल्या विजपूरवटा सुरळीत कधी होईल याची वाट नागरिकांनी पहावे लागत आहे.
महावितरण कंपनीचे भोगस कारभाराचा फटका शालेय विध्यार्थी, व्यवसायीकांना तसेच नागरिकांना. सहन करावा लागत आहे.सततचा खंडित वीज पुरवठा दर ५,१० मिनिटाला तळ्यात-मळ्यात  होत असते. यापासून महाविज वितरण कधी सुटका करणार अशा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
गेल्या काही महिन्यापासून राजाराम व गुड्डीगुडम परिसरात अनेक भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे.
या परिसरात राजाराम,खांदला, पत्तीगांव, मरनेल्ली, कोतागुडम, चिरेपल्ली, रायगट्टा, गोल्लाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगूडम, तिमरम इत्यादी गावे येत असून. या भागात नेहमीच वीज पुरवठा खंडित होत असून नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत.
वीज एकदा गेली की, वीज यायला तासोन तास चातकपक्षां सारखी वाट बघावी लागत असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साप, विंचू निघण्याचे प्रमाण अधिक असते व साप, विंचू चावून दगावन्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शाळेतील विध्यार्थ्यांवर अभ्यासावर देखील भर पडत असतो.सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला आहे.
  वीज बिलाची रक्कम विद्युत वितरण विभाग मात्र बिलाची रक्कम वेळोवेळी घेत असतात.आणि रक्कम भरणा नाही केल्यास तातळीने वीज कापली जाते मात्र वीज पुरवठा सुरळीत केले जात नाही.
राजाराम परिसरातील लाईनमॅन मुख्यालयी राहत नसून नागेपल्ली ला राहत असून त्याच्या हाताखाली एक किव्हा दोन लोकांना ठेवत असून  ते आपल्या मनमानी नुसार काम केले जाते. आणि ते लाईनमॅन नसतांनासुद्धा खांबावर चडून दुरुस्ती करीत असतात.त्याच्या जीवीतास धोका झाल्यास किव्हा काही कमी जास्त झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी म्हटले आहे.  कायमस्वरूपी लाईनमॅनची पदभरती करावी.गुड्डीगुडम व राजाराम परिसरातील वीज वितरण कंपनीने लक्ष देऊन सुरळीत करावे. अशी मागणी परिसतील नागरिकांनी  केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post