कॅचव्हील लाऊन चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणले तर खबरदार



गडचिरोली, 12 जुलै : सध्या पावसाळयात शेती मशागतीचे व पेरणीचे कामे चालु आहेत. शेतातील ट्रॅक्टरची कामे झाल्यावर ट्रॅक्टर बाहेर रोडवर आणण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या चाकाची माती तसेच ट्रॅक्टर कॅचव्हील ची माती शेतातच काढुन ट्रॅक्टर रस्त्यावर काढावेत. माती न काढता ट्रॅक्टर रस्त्यावर चालविल्यास माती संपूर्ण रस्त्यांवर पसरुन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता शेतातील ट्रॅक्टरची कामे झाल्यावर ट्रॅक्टर बाहेर रोडवर आणण्यापुर्वी ट्रॅक्टर चाके तसेच कॅचव्हीलची माती शेतातच काढून ट्रॅक्टर बाहेर रस्त्यावर काढावेत. अन्यथा अशा ट्रॅक्टरविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदर दंड हा रु. 10,000/- पर्यंत असेल याची कृपया नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली विजय चव्हाण यांनी कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post