देवावर प्रचंड विश्वास ठेवणे हे एक मानसिक आजाराचे लक्षण आहे’


जगात सर्वात जास्त देवावर विश्वास ठेवणारे लोक भारतात आढळतात. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवता देवाच्या कृपेने या सर्व जगात जे काही घडत आहे हे देवाच्या कृपेने घडत असते. हि या विज्ञान युगातील शिक्षित लोकांची मानसिकता झाली आहे.
म्हणून सर्व क्षेत्रात भारताची हवी तशी प्रगती झाली नाही.


देवावर श्रद्धा या विषयावर अमेरिकेत अनेक वर्षांपासून संशोधन सुरु होत.शेवटी देवावर विश्वास अन् श्रद्धा हा मानसिक आजार आहे असे तेथील psychological Association नि जाहीर केलं. सर्वप्रथम कोणत्याही प्रमाणाशिवाय कशालाही मान्यता देऊ नये.सर्वप्रथम भारतात बुद्ध झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध मनोवैज्ञानिक (Human Scientist) होते, त्यांनी मानवी मनावर अनेक वर्ष चिंतन (meditation) केले.


शेवटी त्यांनी देव या शब्दालाच तिलांजली दिली. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादे मिथक कोणाच्या अनुभवावरून, कोणाच्या ऐकीव माहितीवरून आले असेल तर अजिबात स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून म्हणजे धर्मग्रंथातुन, पोथी, पुराणातुन आलेली आहे, एवढ्यावरून स्वीकारू नका. बाह्य गोष्टीचा विचार करून स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारू नका. किंवा एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. सांगणाऱ्याचे सुंदर रूप पाहून स्वीकारू नका किंवा संभाव्यता आहे एवढ्यावरून स्वीकारू नका. हा श्रमण आपला गुरु आहे. असा विचार करून स्वीकारू नका. अशा प्रकारचे विचार पसरवून बुद्धाने मानवाच्या मनामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. इतर अवैज्ञानिक रूढी. परंपरा. देव यांचा समावेश धम्मात होऊ नये. याची पुरेशी काळजी बुद्धाने घेतली आहे. बोद्ध धम्मात अंधश्रद्धेला कुठेही थारा नाही. हा बौद्ध धम्म विज्ञानाच्या आधारावर आधारित असून देव या संकल्पनेला तिलांजली दिली आहे.
नंतरच्या काळात या विज्ञानवादी विचारांचा प्रचार प्रसार न झाल्यामुळे यानंतर बुद्धधम्माची पीछेहाट झाली. मनुवाद पुढे आला आणि बुद्धिप्रामाण्यवाद मागे पडला. बुद्धाच्या मूलतत्वाचा आपल्याला विसर पडला. भारतात मानवी मेंदू गोठवण्याचे तत्वज्ञान पेरण्यात आले. परिणाम हा झाला कि धर्म विरुद्ध विज्ञान हि लढाई फक्त युरोपमध्ये सुरु झाली. आजही आपण विज्ञान स्वीकारत नाही. आपण फक्त तंत्रज्ञान स्वीकारतो. आपल्या देशात अणुभट्टीमधे काम करणारा माणूस सुद्धा भलामोठा गंध लावून जातो. इथल्या धर्मग्रंथांनी विचार निर्माण होण्याकरिता माणसामध्ये मेंदूच शिल्लक ठेवला नाही.


ईश्वर कोणीही पहिला नाही. त्याला काहीही प्रमाण नाही. तरीही लोक त्याचे पूजन करतात. त्यांचे नमन करतात. मला जे काही मिळालेले आहे ते ईश्वराच्या कृपेनेच मिळाले आहे. असे मानतो. हि मानसिक गुलामगिरी आहे.. जे मुळात अस्तित्वातच नाही. त्याला मान्यता देणे त्याची पूजा करणे. ही मानसिक विकृतीच आहे. हा मानसिक आजार आहे.
अमेरिकेतील pschological Association नि जगासमोर मांडलेले संशोधन हा चार्वाक्य आणि बुद्ध विचारांचा विजय आहे. पुन्हा एकदा देवाचं विसर्जन करूया. अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून कायमच हद्दपार करूया.

Post a Comment

Previous Post Next Post