गोंडवाना गणतंत्र पार्टी चिमुर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार,प्रशांतभाऊ मडावी


गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली- होवू घातलेल्या चिमुर - गडचिरोली लोकसभा निवडणुक गोंडवाना गणतंत्र पार्टी स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही असे नुकत्याच पार पडलेल्या गोंगपा जिल्हा गडचिरोली च्या जिल्हा कार्यकारणीत ठराव मंजुर करण्यात आला अशी माहीती गो.ग.पा जिल्हाअध्यक्ष प्रशांतभाऊ मडावी यांनी दिली. दि.१८/०३/२०२४ रोजी गोंडवांना गणतंत्रपार्टी च्या कोर कमिटीची बैठक प्रशांत शामकांन्त मडावी यांच्या घरी गोंगपा पार्टी कार्यालयात पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, सदर बैठकीत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र हे गो.ग.पा स्वबळावर लढवणार आहेत हे सर्वानुमते ठरवण्यात आले. सदर बैठकीत.
जिल्हा अध्यक्ष प्रशांतभाऊ मडावी,जिल्हाउपाध्यक्ष डॉ. साईनाथ कोडापे,जिल्हा महामंत्री किशोर मात्लामी,जिल्हा महासचिव रमेश कोरचा सर,सतीश कुसराम, अ.भा.आ.वि.परिषदचे जिल्हाध्यक्ष कुणालभाऊ कोवे तथा गो.ग.पा तालुकाध्यक्ष वडसा क्रिष्णा उईके, धाणोरा ता. अध्यक्ष तुमरेटी, ता.उपाध्यक्ष धाणोरा नारायण सयाम, अमीत शेख ता. संघटक धाणोरा सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सन २००४ चे दरम्यान सिरोंचा विधानसभा ची निवडणुक गोंडवाना गणतंत्र पार्टी स्वतंत्रपणे निवडणुक लढविली होती त्यावेळेस राजे धर्मराव बाबा आत्राम हे बहुमतांनी निवडुन आले होते हे विशेष आजही आदिवासी हे गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत उभे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post