वडसा वनविभाग डिव्हीजन मधील वनतलाव , बंधारे , वनविभागाच्या क्वॉटर मधील भ्रष्टाचारांची चौकशी करा. रिपाईच्या शिष्टमडळाने DFo ना दिले निवेदन


गडचिरोली - वनविभाग वडसा डिव्हीजन मधील कुरखेडा , वडसा ,आरमोरी तालुक्यातील वनविभागा मार्फतीने सुरु असलेले व पुर्ण झालेले वनतलाव , बंधारे व वनविभागाचे क्वॉटर च्या कामामधे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तेव्हा सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अश्या प्रकारचे निवेदन उपमुख्यवनसरक्षक वनविभाग वडसा यांना रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या एका शिष्टडळाने दिली. वनविभाग आरमोरी तालुक्यातील वनविभागाचे वनतलाव ' बंधारे व वनविभागाचे क्वॉटर च्या बांधकामांत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन सदर बांधकाम हे निकृष्ठदर्ज्याचे होत असुन सदर बांधकामात अवैध रेतीचा वापर केल्या गेलेला आहे. सदर कामाची योग्य चौकशी व्हावी यासाठी अश्या प्रकारची तक्रार Dfo सालविठ्ठलानी यांना रिपाईचा एका शिष्ठमडळानी दिली. निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाधक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर , उपाध्यक्ष मारोती भैसारे ' रुषी सहारे दिनेश बनकर , सत्यवान रामटेके , नाजुक भैसारे आदि होते.

Post a Comment

Previous Post Next Post