तिने लग्न लावते म्हणून नेले अन् तिघांच्या हवाली केले




आरमोरीतील धक्कादायक घटनाः महिलेसह एक युवक ताब्यात, दोघे अद्याप फरार

 आरमोरी : एका अल्पवयीन मुलीला तुझे लग्न लावून देते, अशी फूस लावून महिलेने गडचिरोलीत आणले व तीन युवकांच्या हवाली केले. या मुलांनी भाड्याची खोली घेऊन तिचे लैंगिक शोषण केले. ही संतापजनक घटना येथे

३ एप्रिल रोजी उघडकीस आली. महिलेसह एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे अद्याप फरार आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा वाळके (२७) हिने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढविली.

त्यानंतर तिला तुझे लग्न लावून देते, असे सांगून गडचिरोलीला नेले. तेथे एका युवकासोबत तुझे लग्न लावून द्यायचे आहे, असे सांगून किरायाच्या खोलीत ठेवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. इतर दोन युवकांनीही तिच्यावर अत्याचार केला.


रॅकेट सक्रिय ?

• मुलींना पळवून नेत त्यांच्या अब्रूचा सौंदा करणारे रॅकेट तर सक्रिय नाही ना, अशी शंका व्यक्त्त होत आहे. दोन आरोपी गडचिरोलीतील असून त्यांच्या अटकेनंतर अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post