विमान कोसळून तब्बल 133 ठार....

चीनमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे . तब्बल 133 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग विमान जंगलात पर्वतावर कोसळले आहे . या दुर्घटनेत सर्वच्या सर्व प्रवासी आणि विमान चालकासह अन्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे . हा अपघात नक्की कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही . मात्र , या मोठे दुर्घटनेबद्दल जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे .दक्षिण चीनमधील गुआंगशी या प्रांतात विमानाचा हा अपघात झाला आहे . आजवर जगात ज्या काही मोठ्या विमान दुर्घटना घडल्या आहेत . त्यातील ही एक असल्याचे सांगितले जात आहे . काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार , हे विमान कुनमिंग या शहरातून चांगशुई या शहराकडे जात होते . दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान या विमानाने उड्डाण घेतले . त्यानंतर हे विमान दुपारी ३ वाजता निश्चित विमानतळावर पोहचणार होते . मात्र , वाटेतच हा मोठा अपघात झाला आहे . घनदाट जंगलात हे विमान कोसळले आहे . दुर्घटना कशामुळे झालीयाचा शोध सुरू आहे . तसेच , आपत्ती निवारण पथक , पोलिस आणि अन्य मदतकार्य करणारे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post