रेती 5000 रुपये प्रति ब्रास ट्रॅक्टर !.....पण तेही चोरलेली


                    (फाईल फोटो)

मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू...रेती 5000 रुपये प्रति ब्रास ट्रॅक्टर !.....पण तेही चोरलेली

शेगाव :- परिसरात येणाऱ्या इरई नदी व नाल्याचे रेती घाट जिल्हा प्रशासनाने लिलावात न काढल्याने शेगाव , चारगाव , मेसा , पोहा , अर्जुनी , आष्टा , चंदनखेडा , बोरगाव या भागांत रेती तस्कर सक्रीय झाले असून , मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जात आहे . ही रेती प्रति ट्रॅक्टर 5000 रुपये , याप्रमाणे सर्रासपणे विकलीही जात आहे . यात स्थानिक व परिसरातील रेती तस्करांसोबत वरोरा भद्रावती तालुका महसूल विभागाचे काही कर्मचारी व स्थानिक पोलीस विभाग यांचेदेखील हात ओले झाल्याचे बोलले जात आहे . रात्रीच्या सुमारास रेती घाटातून चोरी केलेली रेती दिवसाढवळ्या रेती तस्करांच्या निगरानीमध्ये गरजू ग्राहकांना घरपोच पोहोचविली जाते . या भागातील पारधी घाट , आष्टा घाट , अर्जुनी रेती घाट व इतर नदी नाल्यातून हजारो ट्रॅक्टर रेती चोरीच्या मार्गाने विकल्या जात प्रशासनाच्या महसूल विभागाचे यात मोठे नुकसान होत आहे . मागील महिन्यात प्रशासनाने रेती तस्करी प्रकरणी कारवाई केली होती . मात्र , तस्करी सुरूच आहे .

Post a Comment

Previous Post Next Post