बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून धाडसी पत्नीने पतीचा जीव वाचवीला

फाईल फोटो
अहमदनगर : आपल्या पतीचे डोके बिबट्याच्या
जबड्यात असतांना कोणतीही पर्वा न करता बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून धाडसी पत्नीने पतीचा जीव वाचवल्याची थरारक घटना अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात दरोडी चापळदरा घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजना पावडे असे या धाडसी पत्नीचे नाव आहे तर गोरख पावडे असे बिबट्याने हल्ला केलेल्या पतीचे नाव आहे. पारनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत असणाऱ्या दरोडी चापळदरा भागात पावडे कुटुंब वास्तव्यास आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरख हे पाहण्यासाठी गोठ्यात गेले. त्याचवेळी बिबट्याने गोरख यांच्यावर हल्ला केला व बिबट्याने गोरख यांचे डोके आपल्या जबड्यात पकडले होते. दरम्यान गोरख यांनी प्राण वाचवण्यासाठी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तो आवाज ऐकून त्यांची पत्नी संजना यांनी गोठ्याकडे धाव घेतली व समोरचे दृश्य पाहून हादराच बसला. परंतु पतीची अवस्था पाहून संजना यांनी कसलाही विचार न करताधाडस दाखवून रणरागिणी सारखी लढा देण्यासतयार होत बिबट्याच्या शेपटीला धरून त्याला मागे खेचले. एका हाताने पाय धरला तर दुसऱ्या हाताने पोटात मारले. याचवेळी आपल्या मालकावर हल्ला झाल्याचे पाहात त्यांच्या पाळीव कुत्र्याने मालकाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. गोरख पावडे यांचे वडील दशरथ यांनी दगडाने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे आपलीच शिकार होते की काय असे वाटू लागल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या घटनेत पतीचे प्राण तर वाचलेच परंतु त्या धाडसी पत्नीचे सुद्धा सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. पत्नीने धाडस दाखविल्याने पत्नीने आपल्या पतीची रक्षा केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post