देसाईगंज महसूल विभागाच्या हातावर तुरी देऊन रेती तस्कर झाला पसार....! -पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून झाला गहाळ.... - देसाईगंज पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल


सत्यवान रामटेके(उपसंपादक)
गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज महसूल विभागात रेती तस्कराबाबत एक अनोखा व आगळा-वेगळा प्रकार २४ मार्च २०२२ रोजी अंदाजे पहाटे ४.०० ते ४.३० वाजेच्या सुमारास घडलेला असून सदर घटना  हास्यास्पद असल्याने देसाईगंज महसूल विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की,दर बुधवारला रात्रपाळी चौकीदार म्हणून तलाठी कार्यालय कोकडी येथील कोतवाल धनपाल कोटांगले वय-५३ वर्षे व सोबत पोटगांव तलाठी कार्यालय येथील कोतवाल तुळशीराम कोल्हे यांची तहसील कार्यालय देसाईगंज या ठिकाणी २३ मार्च २०२२ रोजी चौकीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.अशातच तहसील कार्यालय देसाईगंज येथील अवैध गौण खनिज पथक मधील कर्मचारी  पथक यांनी काही प्रमाणात रेती भरलेला ट्रॅक्टर क्रमांक- एम एच ३४ ए पी ३२९७ व ट्राली क्रमांक-एम ३४ बी आर ४३८० देसाईगंज कार्यालयात जमा केला.काही प्रमाणात रेती भरलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केल्यानंतर रात्रपाळीसाठी दोन्ही कोतवाल कार्यरत असतांना अज्ञात इसमाने रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन पसार होणे ही नवलाची बाब झाली आहे.
त्यामुळे देसाईगंज महसूल विभागावर शंका-कुशंकेचे ताशेरे ओढले जात आहेत.मुखत्वे म्हणजे सर्वकाही होऊनही न झाल्यासारखा देखावा केला जात आहे.पकडलेला ट्रॅक्टर अज्ञात इसम तहसील कार्यालयातून जर कां नेत असेल तर....?अधिकारी वा कर्मचारी वर्ग किती कार्यतत्पर आहेत.यावरून दिसून येत आहे.सदर ट्रॅक्टर धारकावर दोन्ही कोतवाल बंधूनी देसाईगंज पोलीस विभागाकडे आपबीती सांगून गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र सदर ट्रॅक्टर धारकाचे ट्रॅक्टर क्रमांक व ट्राली क्रमांकावरून 'तो' अज्ञात इसम कोण?हे माहित पडणार असल्याने त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.अन्यथा पाणी कुठेतरी मुरल्या जात असावे याची शक्यता नाकारता येणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post