लॉजवर मिळाला महिला डॉक्टरचा मृतदेह....उडाली खळबळ

नांदेड :- पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृत महिला डॉक्टर असून ती नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी आहे. दरम्यान सदर महिला २३ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार भोकर पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर आता तिचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान लॉजमधील ज्या रूममध्ये सदर महिलेचा मृतदेह आढळला ती रूम आतून बंद करण्यात आली होती. तर मृत महिलेच्या गळ्यावर आणि हातावर कटरने जखमा केल्या होत्या. कटर मृत महिलेच्या हातात असल्याने ही आत्महत्या असल्याची प्राथमिक माहिती वजीराबाद पोलिसांनी दिली आहे. पण मृत महिलेच्या लॉजमधील रूममध्ये मिळालेले दोरी, विविध औषध, कटर हे साहित्य आणि मृतदेहावरील जखमा यामुळे या घटने विषयी संशय व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post