"तू माझे मोहफूल वेचू नको"... असे म्हणत कुऱ्हाडीने केला डोक्यावर वार

फाईल फोटो
आरमोरी :- दि 23/03/2022 यातील फिर्यादी हा आपले पत्नी व मुलाबाळासह आपले शेतात मोह फुल वेचण्यास गेला असता यातील आरोपी नामे रामचंद्र मंगरु उईके हा शेतातील संपुर्ण मोहाचे झाड माझ्या हक्काचे आहेत तु मोहफुल वेचु नको असे म्हणुन शिवीगाळ करून आपल्या जवळील कुऱ्हाडीने डोक्यावर वार केल्याने फिर्यादी जखमी होउन खाली पडला असता त्यास लाथा बुक्यानी मारु लागल्याने जवळ असलेल्या पत्नीला आवाज दिले असता पत्नी व नातेवाईक असे मध्यस्थी होवुन सोडवुन उपचार करीता उप जिल्हा रुग्णालय आरमोरी येथे दाखल केले असे जखमीचे बयाणावरुन व एम.ओ.सा. यांचे अभिप्रायावरुन सदर आरोपी विरुद्ध कलम 326 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करुन प्रणित गिल्डा dysp, मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात पोहवा लक्ष्मण नैताम अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post