खेळातुनच अधिकारी निर्माण होतो - ठाणेदार महल्ले* *मानकी येथे कबड्डीच्या खुले सामन्याचे भव्य उद्घाटन*

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील माणकी येथे जय गुरुदेव क्रिडा मंडळ मानकी द्वारा दि.२९ ते ३० मार्च ला दोन दिवसीय भव्य कबड्डीचे खुले सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
कबड्डी सामन्यांच्या बक्षिसांचे स्वरूप अनुक्रमे प्रथम विस हजार रुपये, द्वितीय पंधरा हजार रुपये, तृतीय दहा हजार रुपये व चतुर्थ पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
सामन्यांचे उद्घाटन उद्घाटक ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या हस्ते व सरपंच कैलास पिपराडे, यांच्या अध्यक्षतेखाली, प्रा. मालेकर सर, प्रमोद वासेकर तालुका अध्यक्ष कॉंग्रेच, उपसरंप शंकर माहुरे, तंटामुक्त अध्यक्ष परशुराम पोटे, पोलिस पाटील सौ.मिनाक्षी मिलमिले,शाळा समितीचे अध्यक्ष विजय काकडे, सुनिल कुत्तरमारे, नितीन वासेकर भाजयुमो महामंत्री यांच्या उपस्थितीत झाले आहे.
यावेळी ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले की, मी एका लहानशा खेडेगावातील खेळाडू असुन प्रत्येक अधिकारी हे खेळातुनच निर्माण झाले असल्याचे उपस्थितीत खेळाडूंना मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषणात गावचे सरपंच कैलास पिपराडे यांनी ग्राम पंचायत तर्फे खेळाडूंना मदत करण्याचे आश्वासन दिले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक कैलास कुळमेथे यांनी केले तर आभार मंडळाचे विठ्ठल गाऊत्रे यांनी मानले.
  क्रीडाप्रेमी बांधवांनी या कबड्डी सामान्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सुनिल कुत्तरमारे अध्यक्ष जय गुरुदेव क्रिडा मंडळ मानकी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post