*वन्यमित्र व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले माकडाला जीवनदान*.

आरमोरी :- शहरातील बर्डी परिसरामध्ये मागील तीन-चार दिवस आधी माकडांची टोळी आलेली होती मात्र यातील एक माकडाचे पिल्लू त्याच्या आई पासून भटकलेला होता व जखमी अवस्थेत वृंधाताई अनिल हेमके यांच्या घरी अडकुन राहिला वृंधाताई हेमके यांनी ही बाब युवारंग च्या सदस्यांना सुचविली युवारंगच्या सदस्यांनी लगेच वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरी चे अध्यक्ष मा. देवानंदजी दुमाने यांना ही माहिती दिली कुठलाही विलंब न करता वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठले त्या माकडाच्या पिल्याला हाता पायाला जबर जखमा होत्या लगेच अत्यंत काळजीपूर्वक माकडाच्या पिल्ल्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी माकडाच्या पिल्ल्यावर डॉ.दोनाडकर मॅडम यांनी उपचार केले याप्रसंगी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.देवानंदजी दुमाने , वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.संजयजी वाकडे , युवारंग चे कोषाध्यक्ष मा. प्रफुलजी खापरे , युवारंग चे संघटक मा. नेपचंद्रजी पेलणे उपस्थित होते यांनातर माकडाच्या पिल्याला वनविभागाच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post