रोजगार सेवकांची निवड झाली..... प्रत्यक्ष निवडणूक मतदान पध्दतीने


अड्याळ : पवनी तालुक्यातील केसलवाडा गट ग्रामपंचायत येथे रोजगार सेवक निवडणूक प्रत्यक्ष मतदान पद्धतीने झाली . या  निवडणुकीत उच्च शिक्षित विवेक धारगावे हे विजयी झाले . पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आणि शांततेत मतदान पार पडल्याचे सांगण्यात आलेगटग्रामपंचायत केसलवाडा येथे पाच वर्षांपासून रोजगार हमी योजनेचे कामे संपूर्णपणे बंद होते . गावातील ग्रामस्थांच्या हाताला काम मिळावे हे उद्दिष्ट पुढे ठेऊन रोजगार सेवक निवडणूक घेण्याचे आयोजन करण्यात आले होते परंतु पहिल्याच वेळेस येथे एकच गोंधळ उडाला व निवडणूक गुरुवारी १० ला घेण्याचे ग्रामपंचायतनेजाहीर केले मागील रोजगार सेवकास भ्रष्टाचार आरोपाखाली बडतर्फ करण्यात आले ती रिकामी जागा भरण्यासाठी ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली आणि त्यात अतिशय महत्त्वाचे म्हणजे याहीवेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठाणेदार सुशांत पाटील यांनी यावेळी हरिश्चंद्र इंगोले व त्यांची चमू मतदानापासून ते रिझल्ट पावेतो तळ ठोकून असल्याने व ग्रामपंचायतने नियोजनबद्ध काम केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही यानंतरही कधीच घडू नये यासाठी ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली आहे . नवनिर्वाचित रोजगार सेवकासमोर आता अनेक लाभार्थी आहेत आणि त्या प्रत्येकाला काम देणे आवश्यक आहे . आता वेळ न घालवता रोजगार हमीची कामे सुरू करावीत अशी मागणी केसलवाडा , सालेवाडा , केसलापुरी येथील ग्रामस्थांनी केली .

Post a Comment

Previous Post Next Post