धक्कादायक घटना वाढदिवसाला आले नाही म्हणून... PSI च्या पत्नीने केली आत्महत्या....


वरूड . ( वा बेनोडा ( शहीद ) गणपत पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक पुपुलवार यांच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आली . गंगा गणपत पुपुलवार ( 32 , रा . साईसंगम कॉलनी , वरूड ) असे मृताचे नाव आहे . या घटनेमुळे वरूड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे . मृतक गंगा यांचे पती गणपत पुपुलवार हे पोलिस प्रशिक्षणाकरिता वाशीमला होते . तर गुरुवारी त्यांच्या आठ वर्षीय मुलाचा वाढदिवस होता . वाढदिवसाला वडील येऊ शकत नव्हते , पत्नीने येण्याचा खूप आग्रह केला , मात्र ते येऊ शकले नाही . त्यामुळे अखेर मुलांच्या असलेल्या डोळ्यादेखत पत्नीने भाड्याने राहत घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली 

नातेवाईकांनी फोडला हंबरडा गंगा पुपुलवार यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांच्या घरी धाव घेतली . या माहितीवरून वरूडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला . मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेला . नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले . गंगा यांचे माहेर नांदेड येथे आहे . यावेळी नातेवाईकांनीही संताप व्यक्त केला . ठाणेदार प्रदीप चौगावकर , बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्यासह पोलिसांनी परिस्थिती हाताळून नातेवाईकांची समजूत घातली . शवविच्छेदनानंतर गंगा यांच्या पार्थिवाला पुपुलवार यांच्या मूळगाव नांदेड जिल्ह्यातील जिरोना नेण्यात आले . या घटनेचा पुढील तपास एपीआय सारिका बागडे करीत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post