आणि इथे मिळते खुलेआम दारू...



देसाईगंज : शहराच्या अनेक वॉर्डात खुलेआम दारू मिळत असल्याचे दिसून येते . शहरातील विविध वॉडर्डात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शहरातील महिलांनी नगर प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे . देसाईगंज शहरातील काही वॉर्डात अवैध दारू विक्री सुरू आहे . याचा वॉर्डातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . शहरातील काहीवॉर्डात अवैध दारू विक्री पूर्णत : बंद झाल्यास पुरुषांमधील दारू पिणे बंद होईल , घरात , वॉर्डात होणारे भांडण तंटे कमी होतील . शहरातील अवैध दारूविक्री बंद करून , दारूबंदी अधिक मजबूत करणे आवश्यक आहे यासाठीनगरपरिषदेने नगर दारूमुक्तीचा प्रस्ताव मंजूर करून दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करावा , अशी मागणी महिलांनी केली . यावेळी माजी नगराध्यक्षा शालू दंडवते , विविध वॉर्डातील महिला , गाव संघटनेच्या महिला , शहर दारूमुक्ती संघटनेच्या सक्रिय महिला , तसेच मुक्तिपथ तालुका संघटिका भारती उपाध्ये , अनुप नंदगिरवार , प्रभाकर केळझरकर , आदी हजर होते 

Post a Comment

Previous Post Next Post