देसाईगंज महसूल विभागाने रेती तस्करांवर घातला आळा...



सत्यवान रामटेके(गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी)

देसाईगंज:- एक दिवसांपूर्वी 'देसाईगंज तालुक्यातील रेती तस्कर पुन्हा झाले सक्रिय..! व रात्रंदिवस रेती तस्करीला आले उधाण,ट्रॅक्टर वा इतर साधने सापडूनही केली जाते मुजोरी' या मथड्याखाली ११ मार्च २०२२ रोजी दखल न्यूज भारत वर गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी दिलेली बातमी प्रसारित होताच १२ मार्च २०२२ रोजी देसाईगंज महसूल विभाग खळबळून जागे होऊन तालुक्यातील कोंढाळा,कुरुड,आमगाव व इतर ठिकाणी नदी घाटांवर खड्डे मारून अवैधरित्या रेती तस्करांवर एकप्रकारे आळा घातला आहे.
अवैधरित्या आळा तर घातला आहे.मात्र काही दिवसांनी रेती तस्कर मारलेले खड्डे बुजविण्यात माहिर झालेले आहेत.त्यासाठी अशांच्या बंदोबस्ताकरीता गुपित कॅमेरांचा वापर करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा 'तुम्ही खड्डे मारा,आम्ही बुजवतो'अशी अवस्था सतत पहावयास मिळत राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post