महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना च्या मदतीला धाऊन आली समाजवादी


गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांना मुंबईत दिला आश्रय..
उपोषणाच्या पहिल्या दिवशी 5 मार्च ला मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात झाली.पहिल्या दिवशीच कळले की 5 वाजता सर्व  सदस्यांना  संपूर्ण साहित्य घेऊन मैदान सोडून इतर ठिकाणी राहण्याची तसेच झोपण्याची व्यवस्था करावी लागेल.5 वाजल्यानंतर आजाद मैदानावर थांबणयास सक्त मनाई आहे..मग समाजवादी पक्षाचे राज्य अध्यक्ष अबु असिम आज़मी साहेब यांच्याशी संपर्क गडचिरोली जिल्हा समाज वादी पक्षाचे अध्यक्ष  ईलियास खान यांनी नागपूर प्रदेश अध्यक्ष परवेज सिद्दिकी साहाब यांच्यामार्फत संपर्क साधून दिला.त्यांनी उपोषण करत्यासांठी
 राहण्याच्या व्यवस्थे साठी अबु आज़मी साहेब यांच्या पि.ए.प्रतिक सरांशी संपर्क साधून दिला.त्यानी सर्वांना कुलाबा येथील पार्टी आफिस मध्ये येऊन थांबण्याची सोय करून दिली.अबू आज़मी साहेबांनी गडचिरोली करांसाठी साठी आपलं पार्टी आफिस खुलं करून मुंबईत आंदोलन कर्तासाठी राहण्या-झोपण्यासाठी आश्रय दिला . त्याचप्रमाणे उपोषणाला बसलेल्या हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना लवकर मिटिंग साठी बोलावून त्यांच्या संपूर्ण समस्या कायमची सोडवाव्यात यासाठी समाजवादी पक्षाचे राज्य अध्यक्ष अबु आज़मी साहेबांनी पुढाकार घेतला.त्यांच्या पुढाकाराने आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी  संघटनेला विधिमंडळ सुरू असताना देखील अमुल्य वेळ देऊन जवळपास एक तास चर्चा केली.
चर्चा सुरू व्हायच्या आधी पासून ते संपेपर्यंत अबू आझमी साहेब यांचे पि.ए. साहेब तेथेच उभे राहिले, वोट बॅंक नसूनही 1000 किमि प्रवास करून मुंबईत आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना माणूसकीच्या नात्याने मदत केली म्हणून महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य राशीद शेख उपाध्यक्ष ज्ञानदीप गलबले, सचिव मिलिंद खेवले, कोषाध्यक्ष सुरज बाबनवाडे, प्रदीप दुर्गे, राजेश धुपम, ज्ञानेश्वर कांबळे, मनोज सिडाम, अजय पातेवार,विकेश सातपुते,चेतन जेंगठे, निहाल जेट्टीवर, मयूर देवतळे , प्रेमसागर जाबोर, हितेश दुर्गे,अमित कुकडकर, महेश चौधरी यांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post