बिग ब्रेकिंग...पोलीस-नक्षल चकमकीत 2 महिला नक्षली ठार


दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व जियाकोर्था , गोर्ली आणि मुथेली जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली . या चकमकीत २ महिला नक्षलींना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे . दरम्यान घटनास्थळावरून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत . पेडारस एलओएस कमांडर मंजुला आणि डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचाकी गंगी अशी चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची नावे असल्याचे कळते .दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व जियाकोर्था , गोर्ली आणि मुथेली जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमक उडाली . या चकमकीत २ महिला नक्षलींना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे . दरम्यान घटनास्थळावरून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत . पेडारस एलओएस कमांडर मंजुला आणि डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचाकी गंगी अशी चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची नावे असल्याचे कळते . मिळालेल्या माहितीनुसार , दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील जियाकोर्था , गोर्ली आणि मुथेली या जंगलांमध्ये आणि काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . मिळालेल्या माहितीच्या आधारे दंतेवाडा डीआरजी , सुकमा डीआरजी , सीआरपीएफ यांचे संयुक्त दल काल मंगळवारी शोध मोहिमेवर निघाले असता सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास गोर्ली आणि मुठेली दरम्यानच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक झाली . या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाची झडती घेतली असता घटनास्थळावरुन 2 महिला नक्षल्यांचे मृतदेह सापडले . तसेच 3 भरमार , 2 टिफिन बॉम्ब , स्फोटके आणि नक्षल्यांचे कॅम्पिंग साहित्य जवानांनी जप्त केले आहे . चकमकीत ठार झालेल्या पेडारस एलओएस कमांडर मंजुला पुनम हिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते तर डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचाकी गंगी हिच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते . या चकमकीनंतर सुरक्षा दलांकडून आजूबाजूच्या परिसरात तीव्र शोधमोहीम राबविण्यात आली .
मिळालेल्या माहितीनुसार , दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील जियाकोर्था , गोर्ली आणि मुथेली या जंगलांमध्ये आणि काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . मिळालेल्या माहितीच्या आधारे दंतेवाडा डीआरजी , सुकमा डीआरजी , सीआरपीएफ यांचे संयुक्त दल काल मंगळवारी शोध मोहिमेवर निघाले असता सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास गोर्ली आणि मुठेली दरम्यानच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक झाली . या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाची झडती घेतली असता घटनास्थळावरुन 2 महिला नक्षल्यांचे मृतदेह सापडले . तसेच 3 भरमार , 2 टिफिन बॉम्ब , स्फोटके आणि नक्षल्यांचे कॅम्पिंग साहित्य जवानांनी जप्त केले आहे . चकमकीत ठार झालेल्या पेडारस एलओएस कमांडर मंजुला पुनम हिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते तर डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचाकी गंगी हिच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर होते . या चकमकीनंतर सुरक्षा दलांकडून आजूबाजूच्या परिसरात तीव्र शोधमोहीम राबविण्यात आली .

Post a Comment

Previous Post Next Post