कोंढाळात ३२ हजार ८०० रुपयांची दारू जप्त

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे पोलीस व मुक्तिपथने गुरुवारी संयुक्त कारवाई करीत ३२ हजार ८०० रुपयांची दारू जप्त केली . याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला . होळीच्या सणानिमित्त गावात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी कोंढाळा येथील दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकली . यावेळी सहा दारूविक्रेत्यांच्या घरी देशी व मोहफुलाची दारू आढळून आली . पोलिसांनी एकूण ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गावातील सहा दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे . यावेळी पोलीस पाटील कुंभलवार , सरपंच राऊत , रामटेके , मुक्तिपथचे तालुका संघटक भारती उपाध्ये , तालुका प्रेरक अनुप नंदगिरवार उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post