"तू श्रीवल्ली सारखी दिसतेस" असे म्हणत माथेफिरू तरुणाने तरुणीची छेड काढत तिला केला मिठी मारण्याचा प्रयत्न

पुणे:- गाजलेल्या पुष्पा चित्रपटातील श्रीवॅल्ली सारखी दिसतेस असे म्हणत माथेफिरू तरुणाने तरुणीची छेड काढत तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहकारनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. तरुणीचा भाऊ सोडविण्यास आला असता त्याला देखील जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात सोहेल आणि अरबाज (दोघेही रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांच्यावर विनयभंग तसेच मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तरुणी व आरोपी एकाच परिसरातील आहेत. दरम्यान आरोपी हे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या घराबाहेर आले. यावेळीतरुणी घराबाहेर आली असता

तिच्याकडे पाहून बघुन शिट्टया मारु लागले. त्यामुळे तीने जाब विचारला. तेव्हा सोहेलने तु पुष्पा चित्रपटातील हिरोईनसारखी दिसतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' असे म्हणत तीचा हात धरुन मिठी मारण्याचा प्रयत्न करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी तरुणीचा भाऊ मदतीला धावला. आरोपींनी त्यालाही जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. वाद मोठा झाल्याने तरुणीने आरडा ओरडा केला. त्यावेळी आरोपी तेथून पळाले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post