गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रकने व्याहाड वरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन युवक गंभीर जखमी

सावली  - गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रकने व्याहाड वरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार दिनांक 27 मार्च रोजी वाघोली बुटी फाट्याजवळ चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावर सकाळी १०.०० वाजता घडली. 
           व्याहाड (बुज) वरुन तीन युवक गडचिरोली येथे दुचाकीने कामासाठी जात असताना वाघोली बुटी फाट्याजवळ गडचिरोली वरुन येणाऱ्या ट्रक क्र. एम. एच. 33 - 4360 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की , दुचाकीवरील तिन्ही युवक 10 ते 15 मीटर अंतरावर फेकले गेले. या भीषण अपघातात हे तिन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांची नावे दिपक मुकुंदा मॅकलवार , रा. व्याहाड (बुज) आणि नेताजी मांदाळे व कैलास कन्नाके , दोघेही रा. वाकल अशी आहेत. अपघात झाल्यावर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला आहे.
           
महामार्गावर अपघात होऊन सुध्दा व फोनवरुन माहिती देऊनही अर्ध्या तासापर्यंत पोलीस अपघात स्थळी पोहोचले नाहीत. शिवाय 108 क्रमांकावर फोन करून सुध्दा रुग्णवाहिका अपघातस्थळी न पोहोचल्याने तिथे जमलेल्या नागरिकांनी खाजगी ऑटो द्वारे जखमींना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले.




Post a Comment

Previous Post Next Post