ग्रामपंचायत मार्कंडा ( कं) येथील ग्रामसेवकाची तात्काळ चौकशी करून निलंबित करा ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन संघटनेची मागणी

चामोर्शी  = तालुक्यातील ग्रामपंचायत मार्कंडा कंसोबा येथील सचिव एल.एच.मिसार यांनी सरपंच,उपसरपंच,वा कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता व त्यांच्याशी कोणती चर्चा न करता स्वमर्जीने ग्रामपंचायतीच्या खास सभेची नोटीस स्वतःच्या (सचिवाच्या) सहीने काढली व सभेत उपस्थित राहण्यास कळवले हे एक प्रकारचे सरपंच यांच्या अधिकाराचे हनन होत असल्यामुळे अशा निष्क्रिय व कामचुकार असलेल्या सचिवाची तात्काळ चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावे.अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ भगत यांच्यासह इतर  पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. याबाबतीत चामोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्रामसेवकांने दिनांक 25 मार्च 2022 रोजी ग्रामपंचायतीची सभा घेण्यासाठी सदर नोटीस कोणत्याही नमुन्यात न काढता आणि सभा घेण्याचे पूर्ण अधिकार सरपंच यांना असतांना सचिव यांनी सरपंच यांच्याकडे कोणती नस्ती सादर न करता व कोणतीही माहिती न देता सभेची नोटीस काढून स्वतःची सही त्या नोटीसवर करून सरपंच,उपसरपंच व सदस्य यांना नोटीस पाठवून सभेला उपस्थित राहण्यास कळवले. तसेच यापूर्वी सचिवांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामाच्या निविदा प्रसिद्ध करतांना सरपंच यांच्याकडे कोणती नस्ती वा माहिती सादर केलेली नाही किंवा निविदा फार्मवर सरपंच यांची स्वाक्षरी न घेता निविदा प्रसिद्धी केल्या.मात्र त्यामध्ये चुकीच्या अटी व शर्ती टाकून सचिव यांच्या निकटवर्तीयांनाच मिळतील असा प्रयत्न केला. याबाबतीत सरपंच मार्कंडा कंसोबा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांच्याकडे दिनांक 14 मार्च 2022 ला सचिवाच्या बाबतीत तक्रार दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी व दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे तक्रारीत नमूद केले. परंतु सचिवावर आजतागायत पणे कोणती कारवाई संबंधित विभागाकडून करण्यात आलेली नसल्याने सचिवाचे मनोबल वाढून ते सरपंच यांना हेतूपुरस्पर अपमानित व बदनामी करण्याचे कृत्य करीत आहेत. यापूर्वी सदर सचिव ग्रामपंचायत गोठणगाव तालुका कुरखेडा येथून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित झालेले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.तसेच हे ग्रामसेवक गडचिरोली येथून येथे - जाने करतात व ते आठवड्यात दोन तिन दिवस उपस्थित राहतात ईतर दिवशी संम्पर्क केला यर मी शासकीय कामात आहे असे सांगतात  म्हणून अशा निष्क्रिय वा कामचुकार असलेल्या सचिवाची संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून त्यांचे निलंबित करण्यात यावे व आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा गडचिरोली जिल्हा परिषदच्या गेट समोर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ भगत यांच्यासह सरपंच्या नंदाताई कुलसंगे, संघटनेचे उपाध्यक्ष तथा सरपंच्या बेबीताई बुरांडे, सरचिटणीस वनश्री चापले,उपसरपंच तथा तालुका सचिव शेषराव कोहळे, कार्यकारणी सदस्य लक्ष्मण वासेकर यांच्यासह अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे.
 याबाबतीत मार्कंडा कंसोबा येथील सचिव एल.एच.मिसार यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अपंग लाभार्थ्यांच्या धनादेशाचे वाटप करण्यासाठी या खास सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात सरपंच्या वनश्री चापले यांना सभेविषयी फोन द्वारे माहिती दिली व चर्चा केली असता त्यांनीच नोटीस काढण्यास सांगितले त्यानंतर शिपाई विकास शेडमाके हे दिनांक 24 मार्च 2022 ला नोटीस वर सही करण्यासाठी घरी गेले असता त्यांनी पत्रावर सही केली परंतु उपस्थित झालेले नाही. मात्र  उपसरपंच्यासह, 07सदस्य सभेला उपस्थित होते. तसेच विकास कामाच्या निविदा प्रसिद्ध करताना सरपंच्यानी सही न केल्याने सदर निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आपल्यावर केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असून राजकीय द्वेषापोटी करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post