अशी कशी दारू सापडत नाही.....आणि पोलीस पकडल्या शिवाय राहत नाही...

चारचाकी वाहनासह 4 लाख 13 हजार रु मुद्देमाल जप्त

वर्धा : दारुची तस्करी होणार असल्याची माहिती हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळताच सापळा रचून चारचाकी वाहनासह 4 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज 21 मार्च रोजी करण्यात आली . याप्रकरणी आरोपी मनोज भारतलाल जैस्वाल ( 54 ) रा . नेहरू वार्ड , हिंगणघाट याला ताब्यात घेवून दारुबंदी कायदयान्वये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्राप्त माहितीनुसार , हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटिकरण पथकास रात्रोच्या सुमारास अवैध दारुची तस्करी होणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली . मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटिकरण पथकाने सापळा कारवाईचे आयोजन केले असता . रेनॉल्ट क्विड कंपनीचे एमएच 32 वाय 5086 क्रमांकाचे चारचाकी वाहन येतांना दिसले . सदर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये विदेशी दारुच्या 11 पेटया आढळून आल्या . याप्रकरणी मनोज भारतलाल
जैस्वाल ( 54 ) याविरुध्द पोलीस स्टेशन हिगणघाट येथे दारुबंदी कायदयांन्वये कारवाई करत दारु व जप्त वाहन असा एकुण 4 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदर कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे . सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर , अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी संपत चव्हाण यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे , निलेश तेलरांधे , सचिन घेवंदे , सचिन भारशंकर , विशाल बंगाले यांनी केली .

Post a Comment

Previous Post Next Post