बापरे.. बाप ..होळीसाठी चक्क बकराच नेला चोरून !

 गोवरी : राजुरा तालुक्यातील माथरा येथील पोलीस पाटील सुरेश हिरामण चहारे यांच्या मालकीचा बकरा अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री चोरून नेला होळीच्या पाडव्यासाठी बकरा चोरून नेल्याची चर्चा आहे सुरेश चहारे सकाळी गोठ्यात गेले असता त्यांना बांधून ठेवलेला बकरा चोरून नेल्याचे लक्षात आले . त्यांनी माथरा परिसरात बकऱ्याचा शोध घेतला . मात्र त्याचा कुठेच शोध लागला नाही होळीच्या पाडव्यासाठी चोरट्यांनी बकरा लंपास केला असावा , असा अंदाज आहे . याबाबत राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली .

Post a Comment

Previous Post Next Post