सापडल्या... सापडल्या... नकली नोटा सापडल्या एकाला अटक


बुलढाणा:- जिल्ह्यातील मलकापूर येथील नकली नोटा प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे.
एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला नकली नोटा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव शहेजाद खान असे आहे. एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहेजाद खान यांना मलकापूरातील मालीपुरा मंगलगेट परिसरातून बुधवारी अटक केली. नायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी मुळ रा.

गुजरात ह. मु. वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापुर, नांदुरा येथून आतापर्यंत सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. दरम्यान 16 मार्च रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान शहर पोलिसांनी इत्तेहादुल मुस्लिमीन एएमआयएम या पक्षातून एक महिन्यापूर्वी पदावरून पायउतार कारण्याता आलेले माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक शहजाद खान सलीम खान याला अटक केली. मुंबई पोलिसांत तक्रार दाखल यापूर्वी अटकेत असलेल्या आरोपीने शहेजाद खान याच्या नावाची कबुली दिल्याने ही अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
नकली नोटा चलनात आणण्याच्या या गोरखधंद्यात जिल्हाभरात साखळीच असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान शहरातील आणखी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तर एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला नकली नोटा प्रकरणात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. लासलगावमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ऑक्टोबर महिन्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश केला होता.
एका महिलेसह पाच जणांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली होती. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 500 रुपयांच्या 291 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. आरोपींनी नकली नोटा कुठून आणल्या आणि त्या किती चलनात आणल्या याचा कसून तपास केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post