देसाईगंज पोलीस प्रशासनाने अवैध धंदे वाल्यांच्या आवळल्या मुसक्या.... - ठाणेदारांनी फुकले रणशिंग,धडक मोहिमेत सर्वांची उडाली धांदल...

सत्यवान रामटेके(उपसंपादक)
देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम यांनी अवैध धंद्यांविरोधात देसाईगंज शहर व ग्रामीण भागात कारवाईचा जो सपाटा सुरू केला तो थांबता-थांबेना...!अशातच अवैधरित्या धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनातर्फे धडक मोहीम राबविण्यात येत असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.
अवैधरित्या धंदे करणाऱ्यांमध्ये सट्टा-पट्टीधारक,दारू विक्रेते,जुगार खेळणारे व इतर अवैध धंद्यांचा समावेश आहे.देसाईगंज ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक लांडे सर,पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपडे,पोलीस उपनिरीक्षक सोनम नाईक व इतर पोलीस विभागातील कर्मचारी यांचा दणका पडताच अवैधरित्या धंदे करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडून सर्वांचे धाबे दणाणले आहेत.कुरुड,कोंढाळाच नव्हे तर तालुक्यातील सर्व अवैध धंदे करणारे भूमिगत होऊन अवैध धंदे बंद करण्यास समर्थन दर्शवित आहेत.पूर्वी अवैध धंदे करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच चालली होती.मात्र आजच्या घडीला देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम यांनी कारवाईचा बडगा उगारताच सर्वांचे धाबे दणाणून 'तो मी नव्हेच'अशी भूमिका अवैध धंदे वाले बजावीत असल्याचे दिसून येत आहेत.
देसाईगंज पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे अनेकजण अवैध धंदे बंद करण्याच्या तयारीत असून ठाणेदार,पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे सर्वच स्तरावरून गुणगान होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post