लोहारा येथे मान्यवर साहेब कांशीरामजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी....



आरमोरी :- आरमोरी विधानसभा बसपा अंतर्गत मौजा लोहारा येथे दिनांक 15 मार्च 2022 ला बामसेफ, डी. एस. फोर. बसपाचे संस्थापक, जन्मदाता, बहुजन हृदय सम्राट, मान्यवर साहेब  कांशीरामजी यांची 88 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करून अभिवादन करण्यात आले.
          याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नीलकंठ जी दोनाडकर साहेब, उद्घाटक मा. वामन जी राऊत प्रदेश सदस्य, तर प्रमुख मार्गदर्शक मा. प्रदीपजी खोब्रागडे जिल्हा प्रभारी, प्रमुख पाहुणे म्हणून मा. योगाजी बांबोडे जिल्हा समन्वयक, मा. ईश्वर मेश्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष,  मा. जयंद्र जी  गायकवाड जिल्हा सचिव,  मा. रघुनाथ पाटील करोडकर  प्रतिष्ठित नागरिक,  मा. विनायक जी सोरते सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते.
          मान्यवरांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  उपस्थितांसमोर चिंतन बैठक घेऊन, मोठ्या जोमाने कार्य करून, बसपाचे गतवैभव प्राप्त करून दाखवू अशी शपथ घेऊन माननीय कांशीरामजी साहेबांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
        याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, बहुजन समाज पार्टी ही एक राजकीय चळवळी सोबतच सामाजिक चळवळ सुद्धा आहे. राजकीय जीवनात चढ-उतार हे येतच असतात. परंतु सामाजिक चळवळ ही कधीही थांबू शकत नाही. किंवा संपू शकत नाही.
 सामाजिक चळवळ नेस्तनाबूत करण्याचे या देशांमध्ये अनेक प्रयत्न होत आहेत. तरी पण फुले , शाहू,  आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत जोमाने सामाजिक कार्यासाठी आपले योगदान देऊन बहुजन समाज पार्टीला सत्ताधारी बनवण्यासाठी व पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे. असे आवाहन मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
  या कार्यक्रमासाठी विधानसभा क्षेत्रातून मा. दिनेश वालदे महासचिव ,  मा. चंद्रशेखर साखरे,  मा. अश्विन बोदेले सचिव,  मा.संतोष मेश्राम,  मा.लक्ष्मण वासनिक,  नरेश सोनटक्के, कांतीलाल बर्डे, रामचंद्र म्हशाखेत्री, राहुल मेश्राम, दिवाकर वासनिक, तुळशीराम म्हशाखेत्री, अरुण म्हशाखेत्री, धाडू बांबोडे, आणि परिसरातील बहुसंख्य युवक-युवती व नागरिक उपस्थित होते.
   या कार्यक्रमाचे संचालन मा. मनोज खोबरागडे तर प्रास्ताविक मा. कृपानंद सोनटक्के विधानसभा अध्यक्ष, तर आभार मा. जयद्रथ बोदेले विधानसभा कोषाध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post