माझी दारू का पकडली? म्हणून पोलिसांसोबत केली झटपटी....



गोंदिया : दारूची धाड घातली यावरून तिघांनी पोलिसांसोबत वादावादी करून महिला पोलीस निरीक्षकांसोबत झटापट केल्याचा प्रकार गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम एकोडी येथे ९ मार्च रोजी रात्री ८.१० वाजेदरम्यान घडला . 

फिर्यादी महिला पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम या ठाण्यात असताना त्यांना एकोडी गावात भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली यावर त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत गेल्या असता आरोपी दारूची धाड घातली म्हणून जोरजोरात ओरडून अशांती निर्माण करीत होते . त्यांना समजावण्यासाठी गेले असता यावर त्यांना समजावत असताना तीन आरोपींनी फिर्यादी कदम यांच्याशी वाद घालून झटापट केली तसेच त्यांच्यासह सहकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला . पोलिसांनी भादंवि कलम १८६,३५३ १८६ , ५०४ , ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post