विवाहित महिलेचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासऱ्यावर पोलिसात गुन्हा दाखल



सातारा:- जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये एका विवाहित महिलेचा सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. याप्रकरणी विवाहित महिलेने बुधवार दिनांक ९ रोजी पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिलेचा छळ हा जास्त शिक्षण शिकल्यामुळे आणि मुलीला जन्म दिला या कारणामुळे झाला आहे. याप्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०१६ पासून पीडित महिलेचा छळ सुरू होता. पीडित महिलेने जास्त शिक्षण शिकल्यामुळे आणि मुलाऐवजी मुलीला जन्म दिल्यामुळे सतत शिव्या देऊन तीला मारहाण केली जात होती.
 
तसेच, पीडितेला व तिच्या मुलीला पैसे न देता सासरी नांदण्यास नकार देत पीडित महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कल्पेश धिरजलाल शहा, कोकीला धिरजलाल शहा, योगेश धिरजलाल शहा, प्रेरणा शहा, कुमुदिनी कोठारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post