संधी)साधू समर्थ त्रिपाठीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपींना अटक, प्रसिद्ध लोकांसोबत फोटो व्हायरल

भोपाळ : देशात ब्राह्मण धर्माचा प्रचार करण्यासाठी तयार केलेल्या साधूंच्या फौजेत अशी अनेक नावे आहेत, ज्यांना बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवून तुरुंगवास भोगावा लागला आहे किंवा ते पळून गेले आहेत. आसाराम, नारायण साई, दाती महाराज, रामपाल, नित्यानंद, भीमानंद, राम रहीम यांची यादी मोठी आहे. आता आणखी एक नवा बलात्कारी बाबा समोर आला आहे. 
सीताराम दास उर्फ समर्थ त्रिपाठी असे त्याचे नाव आहे. याने साधूच्या वेशात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना मध्यप्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील सर्किट हाऊसमधील आहे.या घटनेनंतर मुलीने कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी समर्थ त्रिपाठीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिवकुमार वर्मा यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील पॉशेस्ट भागात एका व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. समर्थ त्रिपाठी याने साथीदारांच्या मदतीने ही घटना घडवून आणल्याचे वर्मा यांनी सांगितले. मुख्य आरोपी सीताराम दास महाराज उर्फ समर्थ त्रिपाठी हा फरार होता. मात्र त्याला रेवा पोलिसांनी सिंगरौली येथून अटक केली. 
तर त्याचा साथीदार आणि कुख्यात गुन्हेगार विनोद पांडे, ज्याने सर्किट हाऊसमध्ये खोली बुक करून मुलीला तेथे आणले होते, त्याला अटक करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. सोमवारी विनोद पांडे सतना येथून मुलीला घेऊन आला होता. ही मुलगी काही वैयक्तिक समस्यांमुळे अस्वस्थ होती आणि तिने त्याची मदत घेतली. पांडे तिला खोलीत घेऊन गेला, तिथे त्रिपाठी आणि इतर दोघांनी दारू प्यायली आणि मुलीला दारू पाजली. 
नंतर पांडे यांच्यासह सर्वजण खोलीबाहेर आले आणि बाहेरून कुलूप लावले. त्रिपाठीने मुलीवर बलात्कार केला आणि नंतर पांडेला गेट उघडण्यासाठी बोलावले. पांडेने मुलीला बलात्काराबाबत कोणाशीही बोलू नये अशी धमकी दिली. विनोद पांडे हा शिक्षा झालेला गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत.
१ एप्रिलपासून सुरू होणार्‍या हनुमान कथा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आरोपी रेवा येथे आला होता. या कथेत श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांच्यासह समर्थ त्रिपाठी सहभागी होणार होता. या कार्यक्रमाचे मोठमोठे बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत, मात्र कथेला सुरुवात होण्यापूर्वीच वेदांती महाराजांच्या शिष्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला.आरोपी समर्थ त्रिपाठी याच्या जवळच्या मित्र परिवारात जिल्ह्यातील बडे नेते, उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकही आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post