ब्रेकींग न्युज दुचाकीची समोरासमोर धडक एक जागीच ठार तर दोन जखमी नंदीगाव येथिल घटना




अहेरी :- आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव येथे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले आहेत.
आलापल्ली -सिरोंचा महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. या मार्गावर खड्ड्या मूळे अनेक अपघात झाले आहे.
या अपघातात सुनील गंगा सोयाम (३२) हा व्यक्ती जागीच ठार झाला. तर गंभीर् जखमी मध्ये कमलेश हणमंतू सडमेक (३५) रा. झिमेला व रमेश केशव सोयाम (४६) रा. राजाराम यांचा समावेश आहे.
अपघातात ठार झालेले व्यक्ती जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते.
आज संध्याकाळी रायगट्टा येथून शाळा आटोपून आलापल्ली कडे परत जात होते व सुनील आणि कमलेश हे दोघे मनेराजाराम येथून नवस कार्यक्रमात जाऊन परत निमलगुडम ह्या आपल्या स्वगावी येत असताना नंदीगाव जवळ खड्डा चुकवण्याचा नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
या अपघातातील गंभीर जखमीना त्वरित उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलवण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post