गोठणगावचा आविका संस्थेवर सावकार गटाचे वर्चस्व




कूरखेडा:- 
तालूक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था गोठणगाव येथील संचालक मंडळाचा सार्वत्रिक निवडणूकीत सावकार गट प्रणीत शेतकरी एकता पॅनलने आज करण्यात आलेल्या मतमोजणीत
 विरोधी गटाचा दारूण पराभव करीत १३ पैकी १३ जागेवर मोठ्या मताधिक्क्याने विजय मीळवत संस्थेवर वर्चस्व अबाधित राखले.
       गोठणगाव येथील आविका संस्थेचा सार्वत्रिक निवडणूकीत दोन गट समोरा समोर आल्याने मोठी चूरस निर्माण झाली होती मात्र सहकार क्षेत्रात असलेला आपला दबदबा कायम राखत "सावकार" गट प्रणीत पॅनलने येथे विरोधकांचा एकतर्फी धूव्वा उडवत संस्थेचा सर्व जागेवर आपले वर्चस्व कायम राखले यावेळी आदिवासी गटातून यशवंत चौरीकर, रघूनाथ तूलावी, रामदास राऊत,शामराव हलामी,लालसू काटेंगे व श्रीराम नैताम यांचा विजय झाला तर गैर आदिवासी गटातून मोहन कूथे व हिराजी माकडे महिला गटातून प्रमीला दूगा व पोर्णीमा नैताम अनूसूचित जाति गटातून प्रेमदास सहारे इतर मागासवर्गीय गटातून पूरषोत्तम मूंगनकर तर भटक्या जमाती गटातून वेणूदास कवरके यानी विजय मीळविला निवडणूक प्रक्रीया सहकार अधिकारी सूशीलकूमार वानखेड़े यानी पार पाडली. निवडणूक परीणामाची घोषणा होताच सहकार नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सह बॅंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोगंरवार, कूरखेडा नगरपंचायतचे पाणी पूरवठा सभापति अॅड उमेश वालदे, माजी जमींदार साबू अंजूम यांचा नेतृत्वात विट्टल प्रधान, निलकंठ माकडे, अरूण कूथे, शालीक मडावी, माजी सरपंच शीवाजी राऊत,प्रल्हाद धोंडणे,जीवन मेश्राम,अण्णा नैताम,रेशीम माकडे,देवा लोहबंरे, महादेव बंसोड,मीनीचंद डोंगरवार,विट्टल गहाने अंताराम उईके,नाना राऊत,निर्भय साखरे लालाजी सहारे जगदिश कांबळे, रविंद्र कूथे अहेमद पठान,रेवनाथ नाकाडे,श्रावण पारधी यानी गूलाल उधळत व फटाक्याची आतिषबाजी करीत विजय उत्सव साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post