चामोर्शी तालुक्यात कोंबडा बाजारांची धूम ! - बुधवार व रविवारला लाखोंची होते उलाढाल,पोलीस विभागाचे दुर्लक्ष



सत्यवान रामटेके(उपसंपादक)

चामोर्शी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पोतेपल्ली व गुंजनवाही येथे आठवड्यातून दोनदा अवैधरित्या कोंबडा बाजार भरवून लाखोंची उलाढाल केली जात आहे.भली मोठी अवैधरित्या उलाढाल होत असूनही पोलीस विभाग एवढे गाढ झोपेत कसे?असा सवाल उपस्थित केला जातो आहे. 
पोतेपल्ली व गुंजनवाही याठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील कोंबडे शौकिनांबरोबरच अनेक तालुक्यातील व बाहेर जिल्ह्यातील नागरिक लाखो रुपये कोंबडा बाजारावर लावण्यास येत असतात. कोंबडा बाजार भरवणारे मुख्य सूत्रधार खेळ खेडवणाऱ्या नागरिकांकडून १० टक्के ते काही रक्कम कमिशन म्हणून कपात करून खुलेआम राजरोसपणे अवैधरित्या कोंबडा बाजार चालवीत आहेत.अवैधरित्या कोंबडा बाजार भरविणाऱ्यांना अभय कुणाचे?यांना परवानगी देतो कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोंबडा बाजाराबरोबरच गोरगरीब नागरिकांना भुरड घालून चुंडी-मुंडीचे खेळ,चक्री व इतर अवैध धंदे त्याच ठिकाणी चालविण्यात येत असल्याने रोजची-रोजी रोटी कमावणारे सर्व गमावून बसतात.कोंबडा हरला वा रक्कम गमावून बसलेले काहीजण तिथेच मिळणाऱ्या गावठी मोहफुलाच्या दारूच्या आहारी जाऊन सुख-दुःख वाटत असतात.सर्वात मोठा सट्टा कोंबडा बाजारांवर खेळला जात असल्याने अशा अवैधरित्या कोंबडा बाजार भरवणाऱ्या मुख्यसूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post