कुऱ्हाडीने मारुन खुन करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा


 चंद्रपूर :
पोलीस स्टेशन शेगाव हददीतील मौजा चारगाव (खुर्द) येथे मृतक नामे नाना चींतु पोहीनकर रा. अर्जुनी ता. वरोरा यास कुऱ्हाडीने मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस १६ मार्च २०२२ रोजी डी. के. भेंडे, सत्र न्यायाधीश, वरोरा यांनी जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला आहे.

पोलीस स्टेशन शेगाव हद्दीतील मौजा चारगाव (खुर्द) वरून अर्जुनी येथे पायदळ जात असतांना आरोपीने मृतकाला थांबवुन तुझा मुलगा कुठे आहे. असा आवाज दिल्यावरून व त्याच्या जुन्या वादावरून शाब्दीक वाद होवुन, आरोपीने आपल्या हातातील कुऱ्हाडीने मृतक नामे नाना चींदु पोहीनकर यांच्या डोक्यावर वार करून जिवानीशी ठार केले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन शेगाव येथे अप कं.

५३/१९९६ कलम ३०२, भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा तपासात घेतल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास पोउपनि पि. एस. मेंढे तसेच सहा पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी सा पोस्टे शेगाव यांनी आरोपी निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे १६ मार्च २०२२ रोजी आरोपी नामे संभा विठु बावणे वय ४८ वर्षे रा. अर्जुनी ता. वरोरा यास कलम ३०२ भादवी मध्ये जन्मठेप व ३ हजार दंड व दंड न भरल्यास ०३ महिण्याचा साधा कारावास तसेच कलम २०१ भादवी कलमवाढ झाल्याने त्यामध्ये ३ वर्षे सजा व १ हजार रू दंड व दंड न भरल्यास ०१ महिण्याचा साधा कारावास अशी शिक्षा डी. के. भेंडे सत्र न्यायाधीश, वरोरा यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे ॲड. एम.एम. देशपांडे, सहा सरकारी अभियोक्ता, वरोरा आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोशि. संतोष निषाद ब नं २५७०, पोलीस स्टेशन शेगाव यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post