आरएसएसची मोठी प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणाला वेग


शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाणार भगवद्गीता, गुजरात सरकारचा निर्णय 

गुजरात:- विद्यार्थ्यांना गुलामीकडे नेणारा
आरएसएसची मोठी प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये शिक्षणाच्या ब्राम्हणीकरणाला वेग आला असून तेथील सरकारने शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या मेंदूवर गुलामी लादून त्यांचे भवितव्य अंधारात ढकलण्याचे षड्यंत्र आखण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुजरातमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्यात आल्याचे म्हटले आहे.
जितू वघानी यांनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद्गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील अशी माहिती सभागृहात दिली आहे. 
सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमांमध्ये भगवद्गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात भगवद्गीता समाविष्ट करण्यात येईल, असं देखील म्हटलं आहे.
शाळांमध्ये यासोबतच, प्रार्थना, श्‍लोक, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धांच्या माध्यमातून देखील भगवद्गीतेचं शिक्षण दिलं जाईल, असं गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये घोषणा केली होती की हरियाणातील शाळांमध्येही भगवद्गीतेचं श्‍लोक शिकवले जातील, एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एका बाजूला शिक्षणाचे ब्राम्हणीकरण आणि दुसर्‍या बाजूला गुजरातमधील ८६ शाळा बंद

एका बाजूला भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेऊन शिक्षणाचे ब्राम्हणीकरण केले जात असताना त्याच गुजरात सरकारला शिक्षण व्यवस्था सुरळीत चालावी असे वाटत नाही. गुजरातमधील ७०० प्राथमिक शाळांमध्ये केवळ एक शिक्षक शिकवत असून दोन वर्षात ८६ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.  तर ४९१ शाळांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. गुजरात सरकारनेच ही कबुली दिल्याने त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post