अन... सुनेने दिला सासू सासऱ्याला विष

नाशिक :- सासू - सासऱ्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेसह तिघांविरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी सुनील भिमराव भिसे ( वय ४४ , रा . सुनील फोटो स्टुडिओ , शिवाजीनगर ) यांनी तक्रार दिली आहे . या तक्रारीवरुन लता सुनील भिसे ( शिवाजीनगर , सातपूर ) , जिजाबाई गुंजाळ ( नवले कॉलनी , नाशिकरोड ) , संजयकुमारपंढरीनाथ पाटील ( रुम क्रमांक ३ , विश्वासनगर , अशोकनगर , सातपूर ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सूनेने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच नवऱ्यालाही विष देवून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे .आहे की , माझी पत्नी लता हिने वेगळे रहाण्यासाठी वारंवार भांडणे करून शिवीगाळ , दमदाटी तसेच मारहाण केली . आई - वडिलांना विष देवून मारण्याचा प्रयत्न केला . तसेच लता हिने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . लता हिने जिजाबाई गुंजाळ यांना फोन करून विष मागवून घेतले व मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली . या सर्व प्रकरणात जिजाबाई गुंजाळ व संजयकुमार पाटील यांनी फूस लावली . या तक्रारीत पत्नीचे अनैतिक संबध संजयकुमार पाटील यांच्यात
असल्याचेही म्हटले आहे . हे अनैतिक संबंध समजल्यावर मी पत्नीला समजावून सांगितले . तरीही संबंध कायम ठेवून फसवणूक केली . या तिघांचा संपत्तीवर डोळा असल्याचेही भिसे यांनी म्हटले आहे . या तक्रारीवरुन भादंवि ३०७ , ३२३ , ५०४ , ५०६ , ४ ९ ७ , १० ९ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात उपनिरीक्षक शेंडकर हे तपास करत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post