आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब तसेच आरोग्य संचालक अर्चना पाटील मॅडम यांच्यासोबत तासभर रंगली चर्चा...

महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या मुंबई येथील आझाद मैदानात केलेल्या उपोषणाला मिळाले यश...

पाच मार्च पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे साहेब तसेच महाराष्ट्र राज्या चे आरोग्य संचालक अर्चना पाटील मॅडम यांनी उपोषण करत्यांना विधिमंडळात मिटिंगसाठी बोलावून त्यांचे प्रश्न व समस्या ऐकून घेतल्या. त्यावेळी त्या ठिकाणी सचिव अर्चना वालझाडे मॅडम तसेच जगताप साहेब सुद्धा उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रिन्सिपल राशीद शेख सर, उपाध्यक्ष ज्ञानदीप गलबले जी यांनी बाजू मांडली. ही चर्चा  जवळपास एक तास चांगलीच रंगली. मंत्री महोदय तसेच संचालक मॅडम यांच्या सकारात्मकतेने सर्वांची मने जिंकली. संघटनेच्या प्रमुख मागण्या तील पहिला मुद्दा अधिसूचना रद्द करण्याबाबत होता. त्यावर मंत्री महोदय यांनी आश्वासन दिले कि, जर ही अधिसूचना हजारो लोकांच्या नोकरीची दारे बंद करत असेल तर ही अधिसूचना रद्द करण्यात येईल. दुसरा मुद्दा 28 फेब्रुवारी 2021च्या आरोग्य सेवक भरतीच्या समांतर आरक्षणातील उमेदवार न मिळाल्याने रिक्त असलेली पदे अगेन्स्ट कोट्यातून तात्काळ भरण्याबाबत होता. त्यावर असे उत्तर देण्यात आले की जि पदे शासन निर्णयानुसार भरता येतात, ती भरण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन भरली जातील. मागण्यातील तिसरा मुद्दा असा होता की, 28 फेब्रुवारी 2021 च्या परीक्षेतील गुणवत्ताधारक यामधूनच उर्वरित 50 टक्के पदे भरून शंभर टक्के पदभरती पूर्ण करावी. या संदर्भात उत्तर देताना असे म्हटले गेले की काही जागा ह्या नव्याने वाढलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित पन्नास टक्के जागा पदभरती लवकरच घेण्यात येईल. मागण्या मधील चौथा मुद्दा जिल्हा परिषद पदभरती लवकर घ्यावी यासंदर्भात होता ‌. त्यावर उत्तर देताना सांगण्यात आले की जिल्हा परिषद पदभरती हा विषय ग्राम प्रशासन विभाग यांचा आहे ‌.ते लवकरच पदभरती घेतील. पाचवा मुद्दा बोगस प्रमाणपत्रधारकांवर कारवाई करून पात्र गुणवत्ताधारक यांना न्याय द्यावा या संदर्भात होता. यावर शासन  पात्र गुणवत्ताधारकांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगण्यात आले. सदर उपोषणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यामधून सतरा उपोषण कर्ते सामील झाले होते. ऊपोषणाचे नेतृत्व प्राचार्य राशीद शेख सर, यांनी केले. आयोजक उपाध्यक्ष ज्ञानदीप गलबले हे होते. त्यासोबतच सचिव मिलिंद  खेवले, कोषाध्यक्ष सुरज बबनवाडे, निहाल जेट्टीवार, मयूर देवतळे, अजय पातेवार, प्रेमसागर जाबोर, हितेश दुर्गे, प्रदीप दुर्गे, अमित कुकडकर, मनोज सिडाम ,चेतन जेंगठे, विकेश सातपुते, महेश चौधरी, राजेश धूपम, ज्ञानेश्वर कांबळे हे सर्व सहभागी होते. ह्या सर्वांनी मुंबईत आश्रय दिला म्हणून समाजवादी चे आमदार अबू आझमी साहेबांचे, उपोषण स्थळी भेट दिली म्हणून, आमदार कृष्णाजी गजबे साहेब तथा आमदार होळी साहेबांचे, विधानसभेत तारांकित प्रश्न केल्याबद्दल आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब तसेच आमदार मुनगंटीवार साहेबांचे  यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post