वाघाने केली गाईची शिकार....

शेतकरी शेतमजूर भयभीत, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

मागील तीन महिन्यांपासून
कोरंबी मारेगांव,पेटुर,सुकनेगाव, नवरगाव,विरकुंड,मोहर्ली, मानकी या परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांची आता पर्यंत मोठ्या प्रमाणात गो धन वाघाने ठार केली आहे. आता माणकी शेतशिवारात आणखी एका गाईची शिकार केली असून आत्तापर्यंत वाघाने ७ जनावरे ठार केले आहे. त्यामुळे मानकी शेतशिवारातील शेतकरी शेतमजूर भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
माणकी येथील गुरुदेव महादेव चिडे यांचे शेत मानकी शिवारात असुन गुरुवारी सायंकाळी ते जनावरांना घेऊन गावाजवळील शेतात घेऊन येत असतांना त्यांची एक गाय पाणी पिण्यासाठी मागे राहिली होती. परंतु रात्रभर गाय शेतात न आल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी शेतात जाऊन पाहिले असता गाय मृतावस्थेत आढळून आली. पाहणी केली असता गाईच्या गळ्यावर व अंगावरील जखमां पाहुन वाघाने शिकार करून ठार केले असावे असे दिसून येत होते. याची माहिती वन विभागाकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरुदेव महादेव चिडे यांचा एक गोरा पंधरा दिवसांआधी वाघाने ठार केला असून आतापर्यंत मानकी व धाबापुर शेतीशिवारात ७ जनावरांना वाघाने ठार केले आहे.
या परिसरात वाघाचा वाढता वावर हा शेतकरी शेतमजूरांसाठी चिंतेचा विषय बनला असून शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भिती निर्माण झाली आहे. परिणामी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post