पोर्ला येथे दारूबंदी मोहीम दरम्यान 15 लिटर मोहफुल दारू व 51 देशी दारू टिल्लू करण्यात आले नष्ट... दारूबंदी समितीची कार्यवाही..

पोर्ला:- दि. 13 एप्रिल 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पोर्ला मध्ये दारूबंदी विषयीची सभा घेण्यात आलेली होती. त्यात दारुबंदी समिती नेमून श्री. रवींद्र सेलोटे यांना दारू बंदी समितीअध्यक्ष पदांवर नेमणूक करण्यात आली व गावातील दारू विक्री करणार्यांना दारू न विक्री करण्याबाबत घरी जाऊन सांगितले तरी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असतांना दारू विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
अध्यक्ष रवी भाऊ सेलोटे यांना माहिती मिळताच पांडुरंग अम्मावार यांचे घरी दारू बंदी पथक रवाना झाले तिथे 3 बिस्लरी बॉटल मध्ये मोहफुलांची दारू मिळाली  घटनास्थळी PSI गडचिरोली श्री. गुरुनिले यांना बोलावून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला . त्या ठिकाणी जवळपास 1500 ते 2000 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला .त्या नंतर श्री परशुराम ठाकरे यांच्या घरी धाड टाकली असता तिठे 15 लीटर मोहफुलांची दारु व 51 टिल्लू असे 7ते 8 हजार रुपयाची दारु आढळून आले. 
ते सर्व जप्त करून ग्रामपचायत कार्यालय पोर्ला समोर नष्ट करण्यात आले.
कारवाही करतांना दारूबंदी समिती अध्यक्ष श्री.रवींद्र सेलोटे ,उपाध्याक्ष सौ.अश्विनी राऊत ,पोलीस पाटील,श्री. हितेंद्र बारसागडे,सरपंच निवृता राऊत , मोनू चापले ,मनोज किरमिरे, मनोज भाणारकर,संतोष दशमुखे ,सादोरकर मॅडम दारुबंदी समिती सदस्य ,काजल भाणारकर ,सोनू धानोरकर,भारती भोयर, ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post