कुत्रीवर अत्याचार, आरोपी अटकेत

यवतमाळ : माणसाची विकृती कोणत्या थराला जाऊ शकते याचा नेम नाही. येथील पिंपळगाव परिसरातील रोहिलेबाबा झोपडपट्टीजवळ एका वृद्धाला कुत्रीवर अत्याचार करताना पकडण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
शेख खलील शेख नदीम (वय ६५, रा. बुटले ले-आऊट) असे त्या नराधमाचे नाव आहे. अक्षय दिगांबर देशमुख (रा. एकलव्यनगर) हे बुधवारी रात्री रोहिलेबाबा झोपडपट्टीजवळून जात होते. तेव्हा कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आला. यामुळे ते थांबले. त्यांनी समोरचे दृश्य पाहून संताप व्यक्त केला. आरोपी काळ्या रंगाच्या कुत्रीसोबत अनैसर्गिक संबंध करताना दिसला. त्यावरून पोलिसांनी कलम ३७७, ५०६ भादंवि गुन्हा नोंदविला.

Post a Comment

Previous Post Next Post