चक्क दारूच्या नशेत 2 पुरुषांनी केलं एकमेकांशी लग्न!

तेलंगणा:- दारुच्या नशेत दोन तरुणांनी एकमेकांशी लग्न केल्याचा विचित्र प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील जोगीपेट येथील २१ वर्षीय तरुणाचे लग्न मेडक जिल्ह्यातील चंदूर येथील २२ वर्षीय तरुणाशी झाले. दारुच्या नशेत या दोघांनी लग्न केलं. डुमापलापेट गावातील एका ताडीच्या दुकानात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. ते अनेकदा मद्यपानासाठी भेटत. गेल्या महिन्यात जोगीनाथ गुट्टा मंदिरात एका समारंभात चंदूर येथील या ऑटोचालक तरुणाने जोगीपेट येथील तरुणाच्या गळ्यात थाळी बांधली होती. सोहळा पार पडला तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते. लग्न झाल्यानंतर दोघे आपापल्या घरी गेले.


गेल्या आठवड्यात जोगीपेठ येथील तरूणाने अचानक ऑटो चालक तरूणाचा घर गाठलं. हा तरूण बेरोजगार असून उदरनिर्वाहासाठी पडेल ती कामं करतो. या तरुणानं ऑटोचालकाच्या पालकांना लग्नाची माहिती दिली.पालकांनी विचारपूस केली असता ऑटोचालकाने सांगितले की, ते अनेकदा दारू पिण्यासाठी भेटत होते परंतु लग्नाबद्दल त्याने नकार दिला नाही. मात्र ऑटोचालक आणि त्याचे पालक जोगीपेठेतील व्यक्तीला या बेरोजगार तरुणाला त्यांच्या घरात येऊ देण्यास राजी नव्हते.चंदूरच्या ऑटोचालक तरूणानेही जोगीपेठच्या तरुणाला त्याच्या घरात जाऊन एकत्र राहण्यास नकार दिला. तेव्हा त्या तरूणानं थेट पोलिस स्टेशन गाठलं. परंतु काही काळानंतर ही तक्रार परत घेण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post