आरमोरी - ब्रम्हपुरी मुख्य महामार्गावर टिप्पर-ट्रकच्या धडकेत 3 जण गंभीर जखमी

ब्रम्हपुरी : आरमोरी - ब्रम्हपुरी मुख्य महामार्गावर आज दिनांक: - 15/4/2022 ला 6 ते 7:00 वाजताच्या सुमारास कांदा भरलेल्या टिप्परची ट्रकला मागेहुन धडक दिल्याने तिन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.सविस्तर वृत्तांत असे आहे की, नागपुर वरून कांदा भरून MH. 28.BB 8396 या क्रमांकाची टीप्पर येतं असतांना किराणा सामान भरलेल्या रस्त्याच्या बाजूला ट्रॅक क्र. MH. 49.AT.8344 उभा होता. तेव्हा नागपुर हुन कांदा भरून येत असलेल्या टिप्परने उभा असलेल्या ट्रॅकला मागेहून जब्बर धडक दिली त्यामध्ये टीप्परचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे कांदा भरलेल्या टीप्परच्या समोरील भागात बसलेल्या वाहन चालक व वाहन स्वाराच्या पायाला जब्बर मार लागल्याने गंभीररित्या जखमी झाले. त्याना उपचाराकरिता ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले.

वृत्त लिहीपर्यंत जखमी ची ओळख अजुनही पटली नसुन घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस विभाग करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post