वाहनचालक व पोलीस शिपाई रेतीची करत होते दरमहा 5 लाख वसुली... चालक आणि पोलिस शिपाई झाला निलंबित

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील कवठा बाजार व राणीधानोरा येथील रेतीघाटावर दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या धाडीत एक कोटी ४० लाखांचा मुद्देमाल जप्त झाला होता. उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी आर्णी पोलीस ठाण्यातील वाहनचालक व पोलीस शिपाई रेतीची वसुली करत असल्याचे सांगितले. त्या दोघांना कर्तव्यात कसुरी केल्यावरून बुधवारी निलंबित केले.

चालक सीताराम पवार, पोलीस शिपाई अमित शेंडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे दोघे रेती तस्करांकडून महिन्याकाठी पाच लाख रुपये हप्ता घेत असल्याचे एसडीपीओंच्या चौकशीत आढळले.

ठाणेदाराच्या कारभारावरही ताशेरे ओढण्यात आले. पैसे घेत असल्याच आरोप असलेला चालक सीताराम पवार हा तहसीलदारांचा नातेवाईक असल्याची बतावणी करत असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आल आहे. मुख्यालयातील दोन्ही वेळच्य गिनतीला या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची सक्ती केली. त्यांन मुख्यालय सोडता येणार नाही, अशी अट घातली आहे. रेतीच्या व्यवसायात महसूल व पोलीस दलातील अनेक जण अप्रत्यक्षरीत्या भागीदार आहेत त्यामुळेच रेती तस्करांचे मनसुबे वाढले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

Post a Comment

Previous Post Next Post