42 वर्षाच्या जीजूने मेहुणीसोबत केल्या नात्याच्या मर्यादा पार...

पुणे:-  शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून बहिणीला नांदवणार नाही अशी धमकी देत एका दाजीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे. जिजूने केलेल्या या प्रकारातून ही पंधरा वर्षाची मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिलेली असून गाडीतळ येथे राहणाऱ्या या 15 वर्षाच्या मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात तिच्या दाजींच्या विरोधात तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दाजीचे वय 42 वर्षे असून सदर प्रकार गाडीतळ येथील साईनाथ वसाहतीत 2020 ते 21 च्या दरम्यान घडलेला आहे.
 
उपलब्ध माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या बहिणीचा पती असून डिसेंबर दोन हजार वीस मध्ये घरी कोणीही नसताना त्याने फिर्यादी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले आणि या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली तर तुझ्या बहिणीला नांदवणार नाही अशी देखील त्याने धमकी दिली त्यामुळे ही मुलगी काही दिवस शांत राहत अत्याचार सहन करत होती.

सदर घटनेनंतर देखील वेळोवेळी तो हाच प्रकार या मुलीसोबत करत करत होता त्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर पाच महिन्यांनी हा प्रकार उघडकीला आला आणि तिने आपल्यावरील अत्याचाराचा पाढाच पोलिसांसमोर मांडला त्यानंतर पोलिसांनी या दाजीला बेड्या ठोकल्या असून सदर प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post